नवे संकल्प, नवी उमेद, नवी झेप

स्पष्ट दिशा, ठाम संकल्प आणि नवी उमेद..  ही फक्त एक घोषणा नाही, तर नाशिकच्या वास्तवाचा प्रामाणिक स्वीकार आणि पुढील प्रवासाची स्पष्ट दिशा आहे. एक वास्तव हे आहे कि एकविसाव्या शतकातलं पाव दशक संपलं, परंतु  नाशिक ज्या वेगाने पुढे जायला हवे होते, त्या वेगाने गेले नाही. संधी होत्या, क्षमता होती, माणसं होती – पण ठोस दिशा, सातत्यपूर्ण नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणीचा अभाव राहिला.

या काळात जगातील अनेक शहरांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला, पायाभूत सुविधा उभ्या केल्या, शिक्षण–तंत्रज्ञान–उद्योग यांची सांगड घातली आणि नागरिकांचे जीवनमान टप्प्याटप्प्याने उंचावले. आपण मात्र अनेकदा तात्कालिक निर्णयांमध्ये अडकलो, पुढील पिढ्यांचा विचार मागे पडला आणि त्यामुळे नाशिकची प्रगती थांबली नाही, पण अपेक्षेइतकी झालीही नाही हीच खरी वेदना आहे.

आता प्रश्न असा नाही की काय गमावलं, तर प्रश्न आहे की आता काय करायचं. नव्या वर्षाची सुरुवात ही स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर नव्याने उभं राहण्यासाठी आहे. आता नाशिकला फक्त मागे राहिलेली अंतरं भरून काढायची नाहीत; तर नियोजनबद्ध विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि नागरिककेंद्रित प्रशासनाच्या बळावर जगातील सर्वोत्तम शहरांच्या पुढे जाण्याची क्षमता निर्माण करायची आहे.

नवे संकल्प म्हणजे केवळ घोषवाक्य नाहीत, ते दीर्घकालीन विचार, मोजता येणारी उद्दिष्टं आणि ठराविक कालमर्यादेत दिसणारे परिणाम आहेत. नवी उमेद म्हणजे आंधळी आशा नाही, ती अनुभवातून आलेला आत्मविश्वास आहे. आणि नवी झेप म्हणजे अचानक उडी नाही, ते मजबूत पायावर उभं राहून टाकलेले ठाम पाऊल आहे.

हे वर्ष आणि आगामी कालखंड नाशिकसाठी केवळ नवीन पान नाही, तर हरवलेला वेळ भरून काढत, पुढील पिढ्यांसाठी भक्कम भविष्य घडवण्याची संधी आहे. आता आपल्याला फक्त पुढे जायचं नाही, तर योग्य दिशेने, योग्य वेगाने आणि योग्य नेतृत्वाखाली पुढे जायचं आहे. 

चला तर मग आपला पारंपरिक वारसा जपतांनाच नाशिकला एक जागतिक दर्जाचे, समस्यारहित व नाविन्यपूर्ण शहर बनवू या

नाशिक साठी शिवसेनेची १८ मोठी वचने

तीर्थक्षेत्र विकास: आस्थेचा सन्मान

नाशिक ही आस्थेची राजधानी आहे – तीर्थराज आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या भूमीला जागतिक दर्जाच्या सुविधा देणे हे आमचे परम कर्तव्य आहे.

गोदावरी घाट रिव्हर फ्रंट

• काशी विश्वनाथासारखे भव्य, स्वच्छ आणि सुसज्ज घाट
• २४ तास शुद्ध व पवित्र पाणी
• दिव्य रोषणाई, ध्वनी व्यवस्था व ध्यानासाठी शांत परिसर
• वृद्ध भाविकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प व विश्रांती कक्ष

पंचवटी विकास

• सर्व प्राचीन मंदिरांचे संवर्धन, जीर्णोद्धार, डागडुजी व स्वच्छता
• रामायणाची प्रत्यक्ष अनुभूती देणारे 3D होलोग्राफीक सेंटर
• आधुनिक पार्किंग, प्रसाद केंद्रे व मार्गदर्शन फलक
• डिजिटल क्यू सिस्टम व AI Powered रिअल-टाइम मॉनिटरिंग

तीर्थयात्री सुविधा केंद्र

• गरिब व दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी मोफत निवास
• स्वच्छ शौचालये, स्नानगृहे व वस्त्रांतर गृहे
• २४×७ वैद्यकीय सुविधा

आस्था आणि आधुनिकता – दोन्ही एकत्र!

  • पर्यावरण पूरक – हरित कुंभ 
  • जागतिक दर्जाचा तीर्थयात्रा अनुभव
  • कोट्यवधी भाविकांसाठी सुरक्षित व नियोजनबद्ध व्यवस्था
  • आंतरराष्ट्रीय प्रचारातून नाशिकची जागतिक ओळख
नाशिक – जागतिक AI आणि Future Tech केंद्र

आपल्या मुलांना पुणे-बंगळुरूला का जावे लागते?
आता नाही. नाशिकच बनेल संधींचे केंद्र!

नाशिक AI इनोव्हेशन सिटी

• ५०० एकर आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेक पार्क
• Google, Microsoft, Amazon सारख्या कंपन्यांसाठी प्रोत्साहन
• जागतिक प्रतिभेसाठी लक्झरी हाऊसिंग व इंग्लिश स्कूल्स

नाशिक डिजिटल युनिव्हर्सिटी

• AI, ML, Robotics, Data Science मध्ये संशोधन
• आंतरराष्ट्रीय प्राध्यापक
• विद्यार्थ्यांसाठी १००% मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्ती

Special स्टार्टअप फंड

• तरुणांच्या कल्पनांना भांडवल
• जागतिक गुंतवणूकदारांशी थेट संपर्क
• कर सवलती व पेटंट सपोर्ट

स्मार्ट सिटी 2.0

• नाशिक सिटी अॅप – सर्व नागरी सेवा एकाच ठिकाणी
• फ्री Wi-Fi आणि 5G रेडी इन्फ्रास्ट्रक्चर
• स्मार्ट लाईट्स, कचरा व पाणी व्यवस्थापन

युवा शक्ती – नाशिकचे खरे भविष्य

नाशिकची तरुणाई म्हणजे  शहराचे खरे Growth Engine आहे! त्यांना संधी दिल्यास नाशिक जगाच्या नकाशावर आणता येईल. आमचे ठोस वचन – प्रत्येक तरुणाला स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची संधी!  

सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगार निर्मिती: भारतात नोकऱ्या आहेत, पण किती सुरक्षित? किती प्रतिष्ठित? आमचे ध्येय आहे – प्रत्येक नाशिककराला गर्वाने सांगता येईल अशी नोकरी!
 
ठोस कृती योजना:
नाशिक रोजगार निर्माण योजना
 
• आयटी पार्क, पर्यटन, कृषी आधारित उद्योग, महिला गृहोद्योग आदींना चालना देऊन दरवर्षी 10,000 नवीन नोकर्‍यांची निर्मिती
• सन्मानजनक पगार
• सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, निवृत्तिसुरक्षा
 
स्टार्टअप इकोसिस्टम
 
• २५ इन्क्युबेशन सेंटर्स संपूर्ण नाशिकमध्ये
• मोफत कार्यालयीन जागा, इंटरनेट, विद्युत
• तज्ञ मार्गदर्शन आणि कायदेशीर सहाय्य
 
सिव्हिल सर्व्हिसेस इन्क्युबेशन सेंटर
 
• UPSC, MPSC च्या तयारीसाठी विश्वस्तरीय सुविधा
• देशातील सर्वोत्तम प्राध्यापक आणि मार्गदर्शक
• गरिबांसाठी संपूर्ण मोफत प्रशिक्षण
• ५०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा
• प्रत्येक गरीब मुलालाही आयएएस बनण्याची संधी मिळेल!
 
कौशल्य विकास अभियान
 
• प्रत्येक बेरोजगाराला मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
• जागतिक मानकांचे प्रमाणपत्र
• १००% नोकरी मिळण्याची हमी
 
युवा उद्योजकता आणि रोजगार क्रांती

• १० विश्वस्तरीय स्टार्टअप हब्स 
• गिग सिटी – फ्रीलान्सिंग, डिलिव्हरी, कंटेंट क्रिएशनसाठी पूर्ण सपोर्ट  
• १०० दिवस हमीशीर रोजगार आणि लाखो नवीन नोकऱ्या  

क्रीडा, संस्कृती आणि नेतृत्व  
• ऑलिंपिक अकादमी, युवा महोत्सव, अॅडव्हेंचर पार्क  
• युवा परिषद आणि मानसिक आरोग्य केंद्रे  

नाशिकचे तरुण बेरोजगार राहणार नाहीत – ते नाशिकला जगातील सर्वोत्तम शहर बनवतील! युवा शक्तीला पंख देऊया – नाशिकला आकाश देऊया!

74 व्या घटना दुरुस्तीनुसार, Urban Poverty Alleviation आणि Socio Economic Development ही महापालिकेची Constitutional Responsibility आहे, हे लक्षात ठेऊन फक्त नागरी सुविधांपुरतं मर्यादित न राहता, महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी स्पष्ट रोडमॅप तयार करून अंमलबजावणी केली जाईल. 

नाशिक स्मार्ट स्कूल मिशन
 
• प्रत्येक शाळेत डिजिटल वर्गखोल्या
• AI-आधारित वैयक्तिक शिक्षण
• जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान आणि प्रयोगशाळा
 
गरीब-श्रीमंत एकच शिक्षण
 
• मनपा शाळांना International Schools सारख्या चांगल्या सुविधा
• मनपा शाळांत स्टेट बोर्ड सोबतच CBSE चा पर्याय
• प्रत्येक मुलाला मोफत पुस्तके, गणवेश, मिडडे मील
• शिक्षकांना नियमित प्रशिक्षण
 
उच्च शिक्षण हब
 
• IIT, NIT, IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थांची Extended Campus नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न 
• आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संलग्नता
• संशोधनासाठी विशेष निधी
 
व्यावसायिक शिक्षण क्रांती
 
• तंत्र शिक्षणाचे आधुनिकीकरण
• उद्योगांशी थेट संबंध
• शिकत कमवा (अर्न व्हाइल यू लर्न)
 

प्रत्येक गरीब मुलालाही Doctor, Engineer, IPS, IAS बनण्याची संधी मिळेल! नाशिकचे शिक्षण जगातील सर्वोत्तम बनेल!

व्यवसाय आणि उद्योग: समृद्धीचा नवा अध्याय
नाशिकची औद्योगिक आणि कृषी परंपरा श्रेष्ठ आहे. आता वेळ आली आहे या परंपरेला आधुनिक आयाम देण्याची.
 
आमचे आश्वासन:
 
नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉर 2.0
 
• ३० दिवसांत उद्योग सुरू करण्यासाठी परवानग्या (सिंगल विंडो सिस्टम)
• लघु-मध्यम उद्योगांसाठी विशेष योजना
• महिला उद्योजकांसाठी दुप्पट सवलती
 
नाशिक वाइन व्हॅली विस्तार
 
• सुला, यॉर्क यांच्यासारख्या आणखी १०० वाइनरीज
• जागतिक पर्यटकांसाठी आकर्षक गंतव्य
• स्थानिक शेतकऱ्यांना प्रीमियम किंमत
 
निर्यात संवर्धन केंद्र
 
• नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी निरनिराळ्या एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल्स सोबत Strategic Partnership
• प्रत्येक उत्पादकाला निर्यात प्रशिक्षण
• आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता प्रमाणन सुविधा
 

प्रत्येक नाशिककर समृद्ध आणि स्वाभिमानी बनेल!

सुरक्षितता, वेग आणि समन्वय
 
Integrated Emergency Response Grid
 
Fire + Police + Medical = एकच समन्वयित प्रणाली
 
• एकच Emergency Number
• Live location + Response tracking
• Command & Control Center
 
सेकंदांत निर्णय, मिनिटांत मदत
 
City Drone Fleet
 
• आग, पूर, आपत्ती व्यवस्थापन
• Crowd control
• Crime patrol
• Traffic monitoring
 
Intelligent Traffic Management System
 
• AI आधारित सिग्नल्स (Real-time)
• अपघातप्रवण भागांवर विशेष लक्ष
• Emergency Green Corridors
• Parking, congestion analytics
 

रात्र असो की दिवस – नाशिक सुरक्षितच!

आरोग्य सेवा: प्रत्येकाचा हक्क, प्रत्येकाचा अभिमान
कोरोना महामारीने आपल्याला काय शिकवले? आरोग्य म्हणजे संपत्ती!
 
आरोग्य सुविधांची क्रांती:
 
नाशिक मेडिकल सिटी
 
• ५ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स (एम्स दर्जाचे)
• प्रत्येक वॉर्डमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र
• मोफत आपत्कालीन सेवा
 
महामारीसाठी कधीही येऊ नये परंतू आपत्कालीन  तयारी नेहमी असावी म्हणून
 
• १०,००० बेड्सची क्षमता
• व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्लांट्स – भरपूर साठा
• तत्काळ रिस्पॉन्स टीम
 
ज्येष्ठांसाठी विशेष
 
• ६० वर्षांवरील सर्वांना मोफत वैद्यकीय तपासणी
• घरपोहोच सेवा
• विशेष वृद्धाश्रम (गरज असलेल्यांसाठी)
 
आपले आई-वडील देवतुल्य आहेत – त्यांची सेवाच आपली पूजा!
 
महिलांसाठी विशेष काळजी
 
• प्रत्येक गल्लीमोहल्ल्यात महिला आरोग्य केंद्र
• गर्भवती माता आणि बालकांसाठी १००% मोफत सेवा
• कर्करोगाची मोफत तपासणी आणि उपचार
• मानसिक आरोग्य समुपदेशन
 
माता-भगिनींचा सन्मान हाच आपला संस्कार!
 
आयुष्मान नाशिक
 
• प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा
• खासगी-सरकारी सर्व हॉस्पिटल्समध्ये मान्य
• कोणीही उपचारासाठी कर्ज घेऊ नये!
 
Right to Health: आरोग्य हा अधिकार आहे! तो विकत घ्यावा लागू नये.
गुन्हेगारी नियंत्रण: Let’s make Nashik Safest City in the world
Mission Zero Crime
आई-बहिणींना रात्री बाहेर पडायला घाबरायचे कारण काय? मुलांना नशाखोरीपासून वाचवायचे कसे?
 
स्मार्ट पोलिसिंग मिशन: पोलीस आणि महापालिका यांच्या समन्वयातून सुरक्षित नाशिक साठी,
 
• १०,००० CCTV कॅमेरे (AI मॉनिटरिंग)
• स्त्रियांसाठी विशेष सुरक्षा दल
• तात्काळ पोलीस मदत 
 
नशाबंदी अभियान
 
 शून्य सहिष्णुता – कठोर कारवाई
 पुनर्वसन केंद्र (व्यसनमुक्तीसाठी)
 युवकांसाठी खेळ आणि मनोरंजन
 
सायबर सुरक्षा
 
 सायबर क्राईम रोकथाम केंद्र
 नागरिकांना जागरूकता
 २४×७ हेल्पलाइन
 
रात्र असो वा दिवस – नाशिक असेल सर्वांसाठी सुरक्षित!
 
महिला सबलीकरण

महिला ही केवळ लाभार्थी नाही, तर शहराच्या आर्थिक व सामाजिक विकासाची महत्त्वाची शक्ती आहे. आमचं महिला सबलीकरणाचं धोरण घोषणा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्पष्ट हमी आहे.

महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन

महिला उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण आणि बाजारपेठ महापालिकेच्या विशेष विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. प्रभाग पातळीवर महिला उद्योगांसाठी स्वतंत्र जागा, सुलभ परवाना प्रक्रिया, व्यवसाय मार्गदर्शन, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण, महिला उत्पादकांसाठी विशेष बाजारपेठ आणि काम करणाऱ्या मातांसाठी आवश्यक सहाय्य सुविधा निर्माण केल्या जातील.

कार्यस्थळी सुरक्षितता कायदा

शहरातील सर्व कार्यालये, दुकाने, कारखाने आणि संस्थांमध्ये महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण सुनिश्चित केलं जाईल. तक्रार नोंदणीसाठी जलद व गोपनीय व्यवस्था, प्रभागनिहाय महिला सुरक्षा समित्या, सुरक्षित प्रवासासाठी मूलभूत सुविधा आणि महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण राबवण्यात येईल.

आमचं वचन:
महिला आत्मविश्वासाने काम करतील, स्वतःचा व्यवसाय उभा करतील आणि शहराच्या प्रगतीत नेतृत्वाची भूमिका बजावतील.

पर्यावरणपूरक नाशिक

नाशिकचा विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती नाहीत, तर शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि टिकाऊ भविष्य आहे. पर्यावरण संरक्षण हे आमच्यासाठी पूरक काम नाही, तर शहराच्या नियोजनाचा केंद्रबिंदू आहे.

दरवर्षी दहा हजार झाडे

प्रभागनिहाय वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निश्चित केली जाईल. देशी वृक्षांची लागवड, रस्त्यांच्या दुतर्फा हरित पट्टे, शाळा-सोसायट्यांचा सहभाग आणि लावलेल्या प्रत्येक झाडाचं किमान तीन वर्षे संगोपन सुनिश्चित केलं जाईल.

निर्मळ गोदावरी

गोदावरी नदीत सांडपाणी जाणं पूर्णतः थांबवण्यासाठी आधुनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, घाटांची स्वच्छता, प्लास्टिकमुक्त नदी परिसर आणि नदीकिनारी जैवविविधता संवर्धन राबवण्यात येईल. गोदावरी ही केवळ नदी नाही, तर नाशिकची जीवनरेषा आहे.

नवीकरणीय ऊर्जा

महापालिका इमारती, रस्त्यावरील दिवे, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा सौरऊर्जा व इतर नवीकरणीय ऊर्जेवर चालवण्यात येतील. नागरिकांसाठी सौरऊर्जा वापरास प्रोत्साहन आणि खर्चात बचत होईल अशा योजना राबवल्या जातील.

प्रदूषण नियंत्रण

हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवलं जाईल. वाहतूक नियोजन, हरित क्षेत्र वाढ, कचरा व्यवस्थापन, बांधकामांवरील नियमांची अंमलबजावणी आणि प्रदूषण मोजणीची पारदर्शक व्यवस्था केली जाईल.

आमचं वचन:
नाशिक हे केवळ वाढणारं शहर नाही, तर श्वास घेण्यास योग्य, राहण्यास आनंददायी आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित शहर बनवणं हेच आमचं ध्येय आहे.

निसर्ग सौंदर्याची लयलूट, वायनरीज सारखी आकर्षणे – नाशकात सर्व काही आहे. फक्त जागतिक प्रसिद्धीची गरज आहे!
 
पर्यटन क्रांती:
नाशिक – भारताचे वाइन कॅपिटल
• तॉस्काना (इटली) सारखे वाइन रूट
• लक्झरी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स
• आंतरराष्ट्रीय वाइन फेस्टिव्हल
आदींना प्रोत्साहन
 
अॅडव्हेंचर टूरिझम
• सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांचा विकास
• ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, पॅराग्लायडिंग
• युरोपियन स्तरावरच्या सुविधा
• हेलिकॉप्टर जॉय राइड्स
 
सिटी टूरिझम
 
• हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस सेवा
• हेरिटेज वॉक्स
• स्ट्रीट फूड फेस्टिव्हल
 
रोजगार = 10 हजार नवीन नोकऱ्या पर्यटनातून
झोपडपट्टी पुनर्वसन: प्रतिष्ठेचे राहणे प्रत्येकाला
आपल्याकडे एवढी प्रचंड साधन संपत्ती, प्रचंड प्रतिभा असतांना काही नागरिकांना गरिबीत आणि झोपडपट्टीत का राहावे लागते? प्रत्येक माणूस सन्मानाने जगण्यास पात्र आहे. गरीबी ही दैवी शिक्षा नाही – ही संधीची कमतरता आहे!
 
स्वाभिमान गृह योजना
• प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला पक्की घरे
• विद्युत, पाणी, स्वच्छता – सर्व मुबलक
• मालकी हक्क – कायमस्वरूपी!
• ५ वर्षांत 5०,००० स्वाभिमान गृहे
 
गरीबी उन्मूलन – समृद्धी सृजन
• कौशल्य विकास = हमीशाहीर रोजगार
• लघु व्यवसायासाठी सर्वतोपरी साहाय्य
• महिला बचत गट = आर्थिक स्वातंत्र्य
 
शिक्षण हेच तारणहार
• झोपडपट्टीतील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण (१२वी पर्यंत)
• IIT-JEE, NEET साठी मोफत कोचिंग
• हुशार विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
गरिबीत जन्म आपल्या हातात नाही, पण त्यावर मात करणे आपल्या हातात नक्कीच आहे!
 
आर्थिक सबलीकरण
• स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र प्रत्येक वस्तीत
• बाजार जोडणी – उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत
• सहकारी संस्था निर्मिती
झोपडपट्टी ही समस्या नाही – ती आपली जबाबदारी आहे! कोणालाही गरिबीत जगावे लागू नये ह्यासाठी ऍक्शन प्लॅन!
 * Nashik-first Procurement Policy
* Local Marketplace
* Startups साठी Seed Support
* Skill mapping + Job matching

नागरिककेंद्रित प्रशासन
* Citizen Working Committees  
* ५०% महिला नगरसेवक  
* २४×७ पाणी-वीज, खड्डेमुक्त रस्ते, मेट्रो  

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जलद प्रशासन!

प्रत्येक प्रभागाला एक स्वतंत्र Ultra-Ward AI– हा २४×७ कार्यरत डिजिटल सहाय्यक नागरिकांशी थेट संवाद साधेल आणि प्रशासनाला क्रांती घडवेल!  
प्रमुख वैशिष्ट्ये:  

  • तक्रार नोंद, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि ऑटोमॅटिक फॉलो-अप  
  • विलंब किंवा गैरव्यवहारांवर तात्काळ अलर्ट  
  • लाइव्ह डॅशबोर्ड आणि डेटा-आधारित अहवाल  
  • नवीन हाय-टेक सोल्युशन्सची शिफारस  
  • नागरिकांची पात्रता तपासून शासकीय योजनांची (PM Awas, Ayushman Bharat, Mudra Loan इत्यादी) यादी आणि अर्ज मार्गदर्शन  
  • बहुभाषी व्हॉइस सपोर्ट  
  • प्रभाग-विशिष्ट माहिती आणि पेमेंट सुविधा  
  • आपत्ती अलर्ट आणि जनजागृती  
  • Predictive Analytics – भविष्यातील समस्या आगाऊ ओळखणे: खड्डे, जाम, पूर, प्रदूषण, तक्रारींचे ट्रेंड्स यांची भविष्यवाणी करून उपाययोजना
  • डेटा-आधारित निर्णय प्रणाली
 नागरिक केवळ मतदार नाही, निर्णयप्रक्रियेचा भाग
 
Citizen Working Committees (प्रत्येक प्रभागात)
 
प्रत्येक प्रभागात स्थापन केल्या जातील Citizen Working Committees (CWC)
 
त्यांना मिळतील:
 
* प्रभाग विकासावर मत मांडण्याचा अधिकार
* प्राधान्यक्रम ठरवण्यात सहभाग
* मासिक आढावा बैठकीत स्थान
* मर्यादित Dashboard Access
* मानधन / सवलती / सार्वजनिक सन्मान
 
लोकशाही मतदानापुरती न राहता सहभागी लोकशाही बनेल.
पायाभूत सुविधा:
 
* पाणी: २४×७ शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरात
* वीज: पुरवठा खंडीत होणार नाही, भरीव सवलत
* रस्ते: खड्डेमुक्त, रात्री उजळलेले, सुरक्षित
* सार्वजनिक वाहतूक: AC बसेस, मेट्रो प्रकल्प, स्वस्त प्रवास

आमची शपथ, आमची जबाबदारी

हा वचननामा केवळ आश्वासन नाही जबाबदारी आहे.

आमची हमी:
✓ दर ३ महिन्यांनी प्रगती अहवाल
✓ सार्वजनिक मॉनिटरिंग

निर्णय तुमचा आहे!

विकास की भाषणे?
प्रगती की आश्वासने?
बदल की स्थिरता?

जय नाशिक! जय महाराष्ट्र! जय भारत!

प्रत्येक नाशिककर हसतमुख, समृद्ध, शिक्षित, आरोग्यवान आणि सुरक्षित असेल – हेच आमचे परम ध्येय!

Scroll to Top